तेलंगणा मध्ये काचेच्या कारखान्यात स्फोट, पाच ठार, 15 जखमी

शुक्रवार, 28 जून 2024 (20:48 IST)
तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात शुक्रवारी एका काचेच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जण ठार तर 15 जण जखमी झाले. शादनगर येथील कारखान्याच्या टाकीत सायंकाळी साडेचार वाजता स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात शुक्रवारी एका काचेच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जण ठार तर 15जण जखमी झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. शादनगर येथील कारखान्याच्या टाकीत सायंकाळी साडेचार वाजता स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.विस्फोटाचे कारण अद्याप कळू  शकले नाही . 
 
शादनगर परिसरात असलेल्या एका कारखान्यात स्फोट झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्वांचा जीव धोक्याच्या बाहेर आहे. स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती