नाशिक : 20 हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्यास अटक

Webdunia
शनिवार, 1 जुलै 2023 (21:57 IST)
20 हजार रुपयांची लाच घेताना एका तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
सचिन काशिनाथ म्हस्के (वय 38) असे लाच घेणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव आणि मुरंबी येथील तलाठ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार व त्यांचे इतर 3 भागीदार यांनी मिळून इगतपुरी तालुक्यात मुरंबी गाव येथे जमीन खरेदी केली आहे. या जमिनीच्या गाव नमुना 7/12 महसूल अभिलेखावर् नोंद करून देण्याच्या मोबदल्यात तलाठी सचिन काशिनाथ म्हस्के यांनी 20,000 रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत तक्रार केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. अखेर आज ही लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले.
 
ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पो. हवा. एकनाथ बाविस्कर, पो. ना. प्रकाश महाजन, पो. शि. नितीन नेटारे यांनी केली.

Edited  By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

पुढील लेख