नाशकात डॉक्टरला तब्बल ३६ लाखांना गंडा ११, जणांवर गुन्हा दाखल

मंगळवार, 27 जून 2023 (21:04 IST)
शहरातील एका डॉक्टरला तब्बल ३६ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. औषध निर्मीती व्यवसायात गुंतवणुक करण्यास भाग पाडून भागीदारीत कच्चा माल मागविण्याच्या बहाण्याने हा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी डॉ.सतिश बुधाजी जगताप (रा.गुलमोहर कॉलनी, डीजीपीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. शिवानी पाटील, सबेरे लाल, चंद्रावती सिंग, शुभम नामदेव, जयश्री शेठ, बिक्रम लिंबू, सुनिल बाल्मिक, जयप्रसाद तिवारी, संजय शर्मा, बिक्रम बंन्सल, अ‍ॅजेल एडवर्ड आणि राजू एंटरप्रायझेस संस्था अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांनी राजू एंटरप्रायझेस नावाची फर्म सुरू करून भामट्यांनी हा डल्ला मारला. डॉ.जगताप यांचा विश्वास संपादन करून संशयितांनी मेंदूच्या विकारावरची काही औषधे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी विक्री व्यवसायात नफा असल्याचे सांगून गुंतवणुक करण्यास भाग पाडले.
 
मे २०२१ ते २५ मे २०२२ दरम्यान डॉक्टरांनी शिवशक्ती चौक येथील आपल्या क्लिनीकमध्ये वेळोवेळी तब्बल ३६ लाखाची रक्कम संशयितांच्या स्वाधिन केली. कच्चा माल मागविण्याचा बहाणा करून संशयितांनी ही फसवणुक केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती