Monsoon Session: मणिपूर घटनेवरून विरोधकांचा सभात्याग

शुक्रवार, 21 जुलै 2023 (13:06 IST)
आज विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस असून काल इर्शाळवाडी येथे दरड कोसळून 16 जण मृत्युमुखी झाले तर 100 हुन अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती सभागृहात देण्यात आली होती. या वरून आज काँग्रेसचे नाना पटोले यांनी आजची इर्शाळवाडीची स्थिती काय आहे ही माहिती दिली नाही.

कोकणातील अनेक गावांतील स्थिती आहे की, तिथे वीज, नाही, रस्ते नाही. या साठी शासनाने काही चर्चा केली पाहिजे. तसेच इर्शाळवाडी पीडितांना राज्य सरकार कडून 5 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही रकम सद्य परिस्थितीला पाहता कमी आहे. सरकारने रक्कम वाढवून देण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे. 
 
पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस असून सभागृहात विरोधकांनी मणिपूरच्या घटनेचा निषेध करत गोंधळ केला आणि समान नागरी कायदा सुरु करण्यापूर्वी मणिपूरच्या घटनेकडे लक्ष द्या असे म्हणत गदारोळ केला. 
 
मणिपूरच्या घटनेबाबत प्रश्न उपस्थित कण्यात आले. पंतप्रधान अद्याप या घटनेवर मौन का बाळगून आहे असे विचारण्यात आले. या गदारोळ मुळे लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले.आता पावसाळी अधिवेशनाचे पुढील कामकाज सोमवार पासून सुरु होणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती