ALSO READ: मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकार 10 कोटी रुपये खर्च करणारजागतिक महिला दिनाच्या एक दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे 3000 रुपये राज्य सरकार पाठवणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात महायुती सरकार कडून या योजनेत बहिणींचे पैसे 1500 रुपयांऐवजी वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अद्याप भाजप सरकार आल्यावर सरकारने 2100 रुपये करण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही.
या बाबत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अशी कोणतीही घोषणा केली नसल्याचे स्पष्ट केले.
या योजनेत आता पर्यंत 9 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्यापासून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यावर त्या अपात्र ठरल्या आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा केले नाही. मात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात आज 7 मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्च असे दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा होणार असल्याचे आदिती तटकरे यांनी जाहीर केले.