उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरु, चर्चेला उधाण

शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (14:53 IST)
खासदार उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुणे येथील सर्किट हाऊसमध्ये बैठक सुरु आहे.. या भेटीमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. यावेळी खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या काही सहकाऱ्यासोबत पुणे येथे अजित पवार यांना भेटण्यासाठी दाखल झाले. अजित पवार यांची कामानिमित्त भेट घेत असल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिल्याची माहिती आहे.
 
दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळं ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे हे समोर आलेलं नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती