हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; आजही निर्णयाची शक्यता नाही

शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (08:28 IST)
राज्यासह देश्यात बहुचर्चित हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा निकाल आज  5 फेब्रुवारीला होण्याची शक्यता होती मात्र न्यायालयीन कामकाज पूर्ण होऊ न शकल्याने जळीतकांड प्रकारणाची अंतिम सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
 
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण हे 2 फेब्रुवारी 2020 ला घडले होते. या प्रकरणात अनेकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आरोपींना तात्काळ कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा न्यायालयीन कामकाज सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडे देण्यात आले होते. या प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाले असून 5 फेब्रुवारीला आरोपीला शिक्षा सुनावली जाणार असल्याची शक्यता होती. मात्र न्यायालयीन कामकाज पूर्ण न झाल्याने निकाल पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे असे सरकारी वकील दीपक वैद्य यांनी सांगितले आहे.
 
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात उद्या निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात होती यावर सरकारी वकील उज्वल निकम यांनी माध्यमांना माहिती दिली होती मात्र कामकाज पूर्ण न झाल्याने उद्या निकाल लागणार नाही हे निच्छित झाले आहे. अंतिम सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती