Maharashtra School : आजपासून राज्यभरातली शाळांची घंटाही वाजणार

मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (10:01 IST)
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यासंदर्भात आज आदेश काढत आज  १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. 
 
राज्याच्या अनेक भागात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यामध्ये देखील शाळा सुरू करण्याबाबत मागणी आहे. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 
 
 शाळा सुरू करतांना सर्व वर्ग स्वच्छ व निर्जंतूककिकरण करण्याविषयी सूचना करण्यात आली आहे. पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घ्यायचे आहे. शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली असणे आवश्यक आहे.कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना बैठक व्यवस्थेतही करण्याबाबतचे निर्देशित करण्यात आले आहे. याशिवाय परिपाठ, स्नेहसंमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते ते टाळणे बाबतही निर्देशित करण्यात आले आहे. मास्कशिवाय शाळेतील प्रवेश वर्जित करण्यात आला असून प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी दोन डोस आवश्यक करण्यात आले आहे.
 
पुणे जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू
 
पुणे जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू होणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करुन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. पहिली ते आठवीची शाळा चार तास असणार आहे. शाळांमध्ये पाठवण्याचा निर्णय संपूर्ण पालकांचा असणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती