सोलापूरकरांना राज्य सरकारकडून दिवाळीची मोठी भेट मिळाली आहे. दीर्घकाळच्या प्रतीक्षेनंतर आजपासून सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होणार आहे. या विमानसेवेचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे. ही विमानसेवा सुरु झाल्यावर सोलापूर-मुंबई मधील प्रवास अवघ्या 50 मिनिटांत पूर्ण होणार. या मुळे प्रवाशांचा पैसे आणि वेळ दोन्ही वाचणार.सविस्तर वाचा..
डोंबिवलीमध्ये मराठी आणि बिगर-मराठी दुकानदारांमध्ये जागेवरून वाद बिगर-मराठी विक्रेत्यांनी जागा रिकामी करण्यास नकार दिल्यानंतर एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला.महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रादेशिकतेचा मुद्दा तापत आहे. मराठी विरुद्ध बिगर-मराठी असा वाद पुन्हा एकदा पेटला आहे.सविस्तर वाचा..
महाराष्ट्रातील "माझी लाडकी बहीण" योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. त्यांना आता त्यांचा ऑक्टोबरचा हप्ता मिळत आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाईल. राज्य सरकारच्या या प्रयत्नामुळे लाखो महिलांना आर्थिक सुरक्षा मिळेल. सविस्तर वाचा..
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शहराला एक अमूल्य भेट मिळणार आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरीचे भव्य बांधकाम पूर्ण झाले आहे आणि ते 17 नोव्हेंबर रोजी, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला, जनतेसाठी खुले होईल.सविस्तर वाचा..
पुणे शहरातील एका न्यायालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून एका 61 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.ही घटना बुधवारी सकाळी 11:45 च्या सुमारास शिवाजीनगर येथील नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत घडली.सविस्तर वाचा..