करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि जेतिबा मंदिर मंगळवारपासून 30 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. श्री जेतिबाची चैत्री यात्रा आणि श्री अंबाबाईचा रथोत्सव सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. मंदिरामध्ये केवळ नित्यनैत्तिक पूजा-अर्चना सुरू राहणार आहे याची भाविकांनी नोंद घवी, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे.