गृह मंत्रालयाने कोविडच्या प्रतिबंधासाठी नवे नियम जाहीर केले निर्बंध 30 एप्रिल पर्यंत लागू राहतील

मंगळवार, 23 मार्च 2021 (19:44 IST)
गृह मंत्रालयाने कोविड-19 संबंधी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.जे 1 एप्रिल 2021 ते 30 एप्रिल दरम्यान लागू असेल. सरकारच्या निर्देशानुसार केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये टेस्ट-ट्रॅक ट्रीट प्रोटोकॉलचा अवलंब केला जाईल. 
सरकारच्या सूचनेनुसार, आरटीपीसीआर चाचणीची संख्या कमी असणारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चाचण्यांची संख्या वाढवून ती 70 टक्के करण्यात येईल.गहन चाचणीत आढळलेल्या नवीन पॉझिटिव्ह प्रकरणांमध्ये शक्य तितक्या लवकर आणि वेळीच उपचार देण्यासाठी विलीगीकरण करण्याची आवश्यकता आहे. 
 
सरकारच्या निर्देशानुसार कंटेनमेंट झोन च्या बाहेर प्रवासी गाड्या, विमान,कंपन्या, मेट्रो रेल,सेवा शाळा, उच्च शैक्षणिक संस्थान, हॉटेल्स,शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स, करमणूक उद्याने, योग केंद्रे आणि जिम, प्रदर्शन यासाठी कार्यक्रम सुरू राहतील. यामध्ये मानक संचालन प्रक्रियेचे पालन करणे अनिवार्य असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती