पुण्यात शाळा-महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद

शनिवार, 27 मार्च 2021 (08:24 IST)
पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुढील आठ दिवसात शहरातील रुग्णसंख्या कमी झाली नाही तर नाईलाजास्तव दोन एप्रिलला लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच, 30 एप्रिलपर्यंत पुण्यात शाळा-महाविद्यालये बंदच राहणार आहेत. अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर आलेल्या माहितीनुसार बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले. अजित पवार म्हणाले, लॉकडाऊन केला, तर गोरगरीबांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ द्यायचा नसेल, तर लोकांनी नियम पाळणं आवश्यक आहे. मागच्या तुलनेत मृत्यूदर कमी झालाय हे खरं आहे. पण परिस्थिती अजूनही गंभीर आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर दोन एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल.
 
पुण्यातील शाळा-महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंदच राहणार आहेत. तसेच, मॉल, चित्रपटगृहांसाठी 50 टक्के उपस्थितीचा नियम बंधनकारक असेल. लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक लोकांच्या उपस्थितीला मनाई, अंत्यविधीसाठी 20 लोकांचीच परवानगी असेल. सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरु राहतील, नंतर ते बंद असतील. असे नवे नियम पुण्यात लागू करण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती