वाचा, पुण्याच्या लॉकडाउनसंबंधी अजित पवार काय बोलले

गुरूवार, 25 मार्च 2021 (15:58 IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील स्थितीसंबंधी माहिती दिली असून लॉकडाउनसंबंधीही भाष्य केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. “मोठ्या प्रमाणात करोनाचं संकट वाढू लागलं आहे. मुख्यमंत्र्यांसहित सर्वजण आवाहन करत आहेत. काही शहरांमध्ये कोरोनाच प्रमाण वाढलं आहे. पालकमंत्री नात्याने पुण्यात लोकप्रतिनिधींना बोलावालं असून दर शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक होत असते. या बैठकीत आम्ही निर्णय घेतो. लॉकडाउनसंबंधी मतांतर आहे, पण नियमांचं पालन केलं पाहिजे यावर एकमत आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
 
त्यामुळे पक्षीय राजकारण मधे न आणता हे आपल्या सर्वांवरचं संकट आहे या भावनेने आपण करोनाशी लढलं पाहिजे. आम्ही ४५ वर्षापुढील सर्वांचं लसीकरण करण्याची मागणी केली होती ती मान्य झाली आहे त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार. पण आता ४५ च्या आतील अनेकांना करोना होत आहे. देवगिरी जिथे मी राहतो तिथे अनेक कर्मचारी वास्तव्यास आहेत. काल सगळ्यांची तपासणी केली तर नऊ लोक पॉझिटिव्ह होते. आपल्याला करोनाचा मुकाबला करावाच लागणार आहे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून आर्थिक मदत कम कमी पडू न देण्याची भूमिका आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती