पुण्यात अग्नीतांडव, छत्रपती शिवाजी मार्केटमधील 25 दुकानं जळून खाक

मंगळवार, 16 मार्च 2021 (10:33 IST)
पुणे शहरातील कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. येथील मच्छी आणि चिकनच्या दुकाने पहाटे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या घटनेत २५ दुकानं जळून खाक झाली. पुण्यातील आगीच्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. हे मार्केट साधारण 70 वर्ष जुनं आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
घटनेबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पुणे शहरातील कॅम्प परिसरात असलेले छत्रपती शिवाजी मार्केट हे सर्वात जुने मार्केट असून येथे मंगळवारी पहाटे ही घटना घडली. मार्केटमध्ये आज पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे सांगितले जात आहे.
 
येथे मोठ्या प्रमाणात मच्छी, चिकन आणि अन्य वस्तूंची विक्री होत असते. आगीच्या या घटनेत मच्छी विक्रेत्यांची १७ आणि चिकन विक्रेत्यांची ८ अशी २५ दुकाने जळून खाक झाली. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती