एसटी महामंडळात आता आयुष्यभर एकाच ठिकाणी नोकरी

शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (09:13 IST)
एसटी महामंडळात नोकरीसाठी  यापुढे कोणत्याही विभागातून अन्य विभागात बदलीसाठी अर्ज सादर करणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र उमेदवारांना भरून द्यावे लागणार आहे. यापुढील सर्व जिल्हानिहाय भरतीच्या जाहिरातींमध्ये हा प्रतिज्ञापत्राचा मजकूर छापण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सूचना दिल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले आहे.
 
दिवाकर रावते म्हणाले, यासंदर्भात जाहिरातीमध्येच अर्जाचा मजकूर छापला जाईल. प्रत्येक जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. इतर जिल्ह्यातील उमेदवाराने नोकरीसाठी संबंधित जिल्ह्यातून अर्ज केल्यास हरकत नाही. मात्र आयुष्यभर त्या ठिकाणी नोकरी करायची तयारी संबंधित उमेदवारी ठेवावी. आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि कुठल्याही पुढाऱ्याचे साठी पत्र दिल्यास त्यावर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे भविष्यात बदल्यांवरून आणखी गोंधळ होणार नाही, असेही रावते यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती