रमीला या रस्त्याच्या कडेला उभ्या राहून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या साईबाबा मंदीराकडे तोंड करुन पाया पडत होत्या. मंदिराच्या दारात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रमीला या मंदीराबाहेर रस्त्यावर पायातील स्लीपर काढून डोळे बंद करुन पाया पडताना दिसतात. त्याचवेळी एका भरधाव कचरागाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये रमीला या गाडीखाली आल्या. तेथे उपस्थित स्थानिकांनी गाडी चालकाला तुझ्या गाडीसमोर एक महिला आल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर त्याने गाडी मागे घेतली. आश्चर्यकारकपणे गाडी मागे झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या रमीला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. त्यांना केवळ किरकोळ जखमा झाल्या. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे.