औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु झालेल्या वादाने नागपुरात हिंसाचाराचे रूप झाले. या प्रकरणात आता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)ने प्रवेश केला आहे. संभाजीनगरसह मराठवाड्यात देखील एनआयए तपास करत आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी खुलदाबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. या वरून नागपुरात हिंसाचार झाला. सध्या मराठवाड्यातील भागात या मुद्द्यावरून शांतता आहे. आता एनआयए संस्था सक्रिय झाली आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये एनआयए दाखल झाली आहे.