Palghar News: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे एका बहुमजली इमारतीतील फ्लॅटमध्ये पती-पत्नीसह तीन जण मृतावस्थेत आढळले.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी एकाच घरात तीन जणांचे मृतदेह आढळल्यानंतर विरार शहरात एकच खळबळ उडाली. पोलिस तपासात एक मोठा खुलासा समोर आला आहे. आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या एका व्यक्तीने प्रथम पत्नी आणि ५ वर्षांच्या मुलीची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत आरोपीचे नाव उदयकुमार काजवा असे आहे. उदयकुमारने आत्महत्या करण्यापूर्वी त्याची पत्नी वीणा काजवा आणि अल्पवयीन मुलीची हत्या केली.
घटनेच्या वेळी उदयकुमार यांचा ११ वर्षांचा मुलगा वेदांत काजवा शाळेत असल्याने तो वाचला, असे पोलिसांनी सांगितले. जर तो घरी असता तर कदाचित त्यालाही आपला जीव गमवावा लागला असता. आर्थिक संकटामुळे एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.