सरकारला कलाकारांची किंमत नाहीये. मुलांना प्रोत्साहानाची गरज : राज ठाकरे

मंगळवार, 20 जून 2023 (21:20 IST)
मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये  चित्रकृती प्रदर्शनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सरकारला कलाकारांची किंमत नाहीये. मुलांना प्रोत्साहानाची गरज असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे.
 
सरकारला कलाकारांची किंमत नाही
मी भाग्यवान आहे. कारण रवी सरांकडे मी शिकलोय. आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम कसं असतं हे या कलाकृतीच्या माध्यमातून आपल्याला समजतं. त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार आपल्या देशात असून देखील आपल्या देशातल्या अनेक लोकांना आणि सरकारला त्याची किंमत नाहीये. जर रवी परांजपे हे फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये असते तर त्यांच्या पेन्टिंगची किंमत आणि या कलाकृतीचं कसं प्रदर्शन केलं असतं याबाबत आपण विचारही करू शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
 
ज्यांना चित्रकलेचा थोडाही गंध असेल तर त्या मुला-मुलांनी याठिकाणी यावं आणि कलाकृती पाहाव्यात. त्यांच्या पालकांनी देखील हे प्रदर्शन पाहायला यावं. फक्त कलाकृती बघताना पेन्टिंगला हात लागणार नाही, याची काळजी त्यांनी घ्यावी, असंही आवाहन राज ठाकरेंनी केलंय.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती