दिखाव्यासाठी, खिशात संविधानाचे पुस्तक घेऊन फिरतात म्हणत नाशिकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर पलटवार
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024 (16:26 IST)
महाराष्ट्रात येत्या 20 नवंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होणार असून मतमोजणी 23 नवंबर रोजी होणार आहे. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून पक्षाचे प्रमुख आणि नेता जाहिर सभा घेत आहे.
पंत प्रधान मोदी नाशिकात आले असून ते निवडणूक सभेला संबोधित करताना म्हणाले की, आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पहिल्या दिवशी मला नाशिकच्या पवित्र भूमीला भेट देण्याचे भाग्य लाभले आहे.
प्रभू राम पुन्हा एकदा परत आले, तेव्हा अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या अगोदर 11 दिवसांचा माझा उपवास विधी नाशिक येथून सुरू झाला. काळाराम मंदिरात स्वच्छता आणि सेवा करण्याची संधीही मला मिळाली. आज पुन्हा एकदा मी 'विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत'साठी आशीर्वाद घेण्यासाठी नाशिकमध्ये आलो आहे.
आपला देश नवनवीन विक्रम करत आहे कारण आज गरीबांची काळजी घेणारे सरकार आहे.
गरीब पुढे जातो तेव्हाच देश पुढे जातो. इतकी दशके काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी गरिबी हटावचा नारा दिला, तरीही गरीबांना अन्न, वस्त्र आणि निवारा हवाच राहिला. मात्र गेल्या 10 वर्षात देशातील 25 कोटी जनता गरिबीतून बाहेर आली आहे. ते म्हणाले की, आज महाराष्ट्र आधुनिक पायाभूत प्रकल्पांमध्ये खूप पुढे आहे. येथे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग बांधले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात येथे गुंतवणूक केली जात आहे.
हे काम कोणत्याही सरकारने बंद केले तर महाराष्ट्र पुढे जाऊ शकेल का, महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील का? हे काम थांबले तर महाराष्ट्र खूप मागे राहील. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना हेच हवे आहे, हा त्यांचा अजेंडा आहे. महाराष्ट्रात कोणतेही मोठे काम झाले की हे लोक विरोध करायला येतात.
काँग्रेस आणि आघाडीचे लोक देशाला मागे टाकण्याची आणि देशाला कमकुवत करण्याची एकही संधी सोडत नाहीत, असे ते म्हणाले. त्यानी या वेळी कॉंग्रेसचे खासदार राहुल गाँधी वर हल्लाबोल करत म्हणाले, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची, न्यायालयाची, देशाच्या भावनांची पर्वा नाही,
केवळ दिखाव्यासाठी ते संविधानाचे पुस्तक खिशात घेऊन फिरत असतात. हे तेच काँग्रेसचे लोक आहेत ज्यांनी 75 वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये बाबासाहेबांची राज्यघटना लागू होऊ दिली नाही.
दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 पुन्हा लागू करण्यावरून गदारोळ झाला होता. या लोकांना काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जम्मू-काश्मीरमधून बाबासाहेबांची राज्यघटना हटवायची आहे. दलित आणि वाल्मिकी समाजाला25 वर्षांनंतर मिळालेले आरक्षण हिरावून घ्यायाचे आहे. ऐसे म्हणत त्यानी राहुल गांधींवर ताशेरे ओढले आहे.
जनतेलाही त्यांचे वास्तव कळले आहे. महाराष्ट्रातील जनताही पाहत आहे, एका बाजूला महायुतीचा जाहीरनामा आहे, तर दुसरीकडे महाआघाडीचे घोटाळे पत्र आहे. काँग्रेसच्या कारवायांमुळे संपूर्ण देशाने काँग्रेसला पूर्णपणे नाकारले आहे, असे ते म्हणाले