अल्पवयीन मुलांचे पालक मनमाडमध्ये दाखल; सहमतीने मुलांना मदरश्यात पाठवल्याचा केला खुलासा

शनिवार, 3 जून 2023 (21:19 IST)
मनमाड  : स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे मदरशाच्या नावाखाली अल्पवयीन मुलांची तस्करी केली जात असल्याचा संशयावरून मनमाड लोहमार्ग पोलिसांनी ४ इसमाना ताब्यात घेतले होते. त्यांच्या सोबत असलेल्या ३० अल्पवयीन मुलांची नाशिकच्या बालसुधार गृहात रवानगी केल्यानंतर आता त्यांचे पालक मनमाड लोहमार्ग पोलिसांत दाखल होत आमच्या सहमतीने मुलांना मदरश्यात शिक्षणासाठी दाखल केल्याचा खुलासा केल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण घेतले आहे.
 
गेल्या चार दिवासापुर्वी मनमाड रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तपणे मानवी तस्करी अंतर्गत केलेल्या कारवाईने खळबळ उडाली होती. पुण्याहून सांगली येथे मदरशामध्ये शिक्षण घेण्यासाठी ५९ मुलांना दानापूर – पुणे एक्स्प्रेसने नेले जात होते.मात्र स्वयंसेवी संस्थेच्या दिलेल्या गुप्त माहिती आधारे २९ काही मुलांना भुसावळ तर ३० मुलांना मनमाड येथे रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेत त्यांची बाल साधारगुहात रवानगी केली.मनमाड येथे अल्पवयीन सोबतच्या चार इसमांना ताब्यात घेतल्यानंतर वैद्य कागदपत्र आढळून न आल्याने मनमाड लोहमार्ग पोलिसात स्थानकात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आले.
 
मात्र प्रसार माध्यमाद्वारे मानवी तस्करीची बातमी अल्पवयीन मुलांच्या पालकांना समजल्यानंतर अखेर तीन दिवसांच्या प्रयत्ना नंतर पकडलेल्या मुलांचे नातेवाईक,पालक आज मनमाड लोहमार्ग पोलिस स्थानकात दाखल झाले. त्यांचे जबाब घेण्याचे काम सध्या सुरु असून आम्ही आमच्या मुलांना शिक्षणासाठी स्वत :हून पाठविले असल्याचे पालक,नातेवाईक यांच म्हणणे आहे.दरम्यान मनमाड पोलिसांचे एक पथक सध्या बिहारच्या दिशेने अधिक तपास कामी गेले आहे.
 
 व्याकुळले चेहरे आणि पानवलेल्या डोळ्यांनी पालक मनमाड येथे दाखल.
 
मानवी तस्करी अंतर्गत मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमाच्या माहितीच्या आधारे बिहार राज्यातील अररिया जिल्ह्यातील पलासी येथील २० पालक त्यांच्या मुलांना ताब्यात घेण्यासाठी तब्बल ३६ तासाचा प्रवास करून व्याकुळले चेहरे आणि पानवलेल्या डोळ्यांनी पालक मनमाड येथे दाखल झाले. या पालकाशी भ्रमरच्या प्रतिनिधी यांनी संपर्क केले असता पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतल्यानंतर पालकांशी संपर्क करायला हवा होता तसे न करता संबंधित प्रशासनाने तस्करीचा गुन्हा दाखल केल्यामुळे आम्ही यावर नाराज व्यक्त केली.मात्र या प्रकरणातून नेमके सत्य काय हे तपास पुर्ण झाल्यानंतर बाहेर येईल,मात्र सध्या या संपुर्ण प्रकरणाचा तपास गुप्त पणे सुरु असल्याच सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
 
उत्तम प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी आम्ही आमच्या मुलांना नेहमीच शिक्षणासाठी महाराष्ट्रात पाठवत असतो. बिहार येथून घेऊन जाणाऱ्या मौलाना यांना मुलांचे कागदपत्र आणि संमती पत्र देखील देत असतो. संबंधित कारवाई ही प्रसार माध्यमाद्वारे बातमी आल्यानंतर आम्ही तात्काळ मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानक गाठले. मात्र संबंधित प्रशासनाने देखील मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पालकांशी संपर्क करायला हवा होता.
 
– मोहम्मद वाजीद, पालक
 
शिक्षण घेणं हा संविधानिक अधिकार आहे.त्यासाठी मुले पालकांच्या संमतीनेच बिहार येथून महाराष्ट्रात येतात यात कुठलीही मानवी तस्करी नाही.
 
– अली रजा,पालक
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती