याबाबत अधिक माहिती अशी की, मखमलाबाद, सिद्धार्थ नगर येथे संशयित मयूर पितांबर सोनवणे (वय २६) यांच्याकडे तलवार असल्याची माहिती सोशल मीडियाव्दारे म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांना मिळाली होती.
संशयित मयूरचा मंगळवारी (दि.१९) वाढदिवस होता. यावेळी त्याचे मित्र परिवार केक घेऊन आले. परंतु मयूर यांनी हा केक मित्रांसमवेत तलवारीने कापला. याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे छायाचित्र एका सामजिक कार्यकत्याने पोलीस व नागरिक मिळून तयार केलेल्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर शेअर केले. ते पाहून वरिष्ठ निरीक्षक सूर्यवंशी यांनी म्हसरुळ पोलिसांसह संशयितास ताब्यात घेऊन त्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.