आज देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. चैत्र शुद्ध नवमी हिंदूंच्या पंचांगानुसार चैत्र नवरात्रीचा आजचा नववा दिवस आणि या दिवशी विष्णूच्या सातव्या अवताराने म्हणजे प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला जातो. प्रभू श्रीराम यांच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते.
राज्यात रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. राज्यातील शेगाव, शिर्डी, पंढरपूर आणि आळंदीमध्ये रामाच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. शिर्डी, शेगाव मध्ये राम जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. राम जन्मोत्सव सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहे. कोरोनाचे निर्बंध काढल्यानंतर मंदिरात साजरा होणार हा पहिला उत्सव असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.