एवढ्या रात्रीही काम करण्याची तयारी कर्मचार्यांनी केली परंतु ऊस जळालेल्या संतप्त शेतकर्याने येथून वीज न्यायची नाही. आमच्या शेतातून वीज नेऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला.यावेळी झालेल्या बाचाबाचीत महावितरणच्या कर्मचार्यांना संतप्त शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेर संबंधित शेतकरी व वरिष्ठ अधिकारी यांच्यात चर्चा होऊन जळालेल्या उसाच्या पंचनाम्यानंतर महावितरणचे कामकाज सुरू होऊन तब्बल 28 तासांनंतर 11 गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.