जनआकोश यात्रा म्हणजे आदित्य ठाकरेंची पायावर कुऱ्हाड - चंद्रकांत पाटील

Webdunia
शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (08:59 IST)
"शक्ती वापरण्यासाठी नव्हे तर भीती दाखवण्यासाठी निर्माण करायची असते. जनआक्रोश यात्रा काढून आदित्य ठाकरे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतायत," असे टीकास्त्र भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

महाराष्ट्रात येणारा महत्वपूर्ण फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता आदित्य ठाकरे हे राज्यभर जनआक्रोश मोर्चा काढणार आहेत.
 
यावरून देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
 
"आदित्य ठाकरे जसजसे जनआक्रोश यात्रेच्या निमित्ताने बाहेर पडतील तसं वेदांत प्रकल्प कोणामुळे महाराष्ट्रच्या बाहेर गेला हे सर्वांना समजेल," असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
 

संबंधित माहिती

पुढील लेख