चंद्रपुरात अस्वलाची दहशत, 3 जणांवर हल्ला
तसेच चंद्रपूर शहरातील बागला चौक संकुलात रात्रीच्या वेळी पुन्हा एकदा अस्वलाचा उपद्रव दिसून आला. 3 जानेवारी रोजी दुपारी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून जात असताना एक अस्वल त्याच्या समोर आला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील देवडा खुर्द बेघर वस्तीजवळील आंबे तलावाजवळ गेल्या तीन दिवसांपासून अस्वलाने तळ ठोकला असून गावातही त्यांचा वावर सुरू झाला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.तसेच अस्वल तीन दिवसांपासून धुमाकूळ घालत असल्याने वनविभागाने कर्मचारी व टीआरटी पथक तैनात करून कामाला लागले आहे.