HMPV भारतात पसरत आहे, नागपुरात आढळले 2 नवीन रुग्ण

मंगळवार, 7 जानेवारी 2025 (08:55 IST)
HMPV News : भारतात आतापर्यंत 7 मुलांमध्ये HMPV संसर्गाची प्रकरणे आढळून आली आहे. बेंगळुरू, नागपूर आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन आणि अहमदाबादमध्ये एक आढळून आले आहे. अशा प्रकारे चीनमध्ये पसरलेल्या या विषाणूने भारतातही जोर पकडला आहे.
ALSO READ: चंद्रपुरात अस्वलाची दहशत, 3 जणांवर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार चिंता दूर करताना, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा म्हणाले की या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने कोविड सारखा उद्रेक होणार नाही. तसेच HMPV हा नवीन विषाणू नाही. तज्ञ असेही म्हणतात की एचएमपीव्हीला क्वचितच रुग्णालयात दाखल करावे लागते.

तसेच महाराष्ट्रात उपराजधानी नागपुरात एचएमपीव्ही संसर्गाची 2 प्रकरणे समोर आली आहे. येथील दोन मुलांमध्ये या विषाणूची लक्षणे आढळून आली आहे. त्याचा एचएमपीव्ही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन मुलांना नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 3 जानेवारी 2025 रोजी झालेल्या चाचणीत सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही मुलांना ताप आणि खोकला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती