महाराष्ट्रात काही जिल्ह्यात वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली असून कपड्यांच्या दुकानात व रस्त्यावरील स्टॉल वरती उबदार कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे सध्या वयोवृद्ध व लहान बालकांना त्रास होत आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी सध्या ग्राहक स्वेटर, मपलेर, जर्किन, कानटोपी खरेदीसाठी नागरिकांची स्वेटर बाजारात एकच गर्दी होत आहे.
गेल्या पाच दिवसांपासून थंडी वाढली असल्याने उबदार कपडे घेणा-या ग्राहकांची संख्या वाढली आहे. रात्रीसह दिवसाही थंडी जाणवत असल्याने नागरिकांची पावले आपोआप उबदारक कपडे खरेदीकडे वळत आहेत. येथील महात्मा गांधी चौकातील जुने रेल्वे स्टेशनच्या गेटवर विक्रेत्यांनी थाटलेल्या स्वेटर बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. उबदार कपड्यांची मागणी वाढल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले आहे.
गेल्या चार, पाच दिवसापासून थंडीचा कडाका वाढला आहे. परिणामी घरातील ऊबदार कपडे बाहेर निघायला लागले आहेत. तसेच नवीन ऊबदार कपडे खरेदीकडेही नागरीकांनी आपला कल वाढवला आहे. स्वेटर मार्केटमध्ये गतवर्षाप्रमाणे या वर्षीही दुकाने थाटली आहेत. यातील काही ऊबदार कपडे विक्रेते कर्नाटक, मुंबई येथील तर काही विक्रेते हे स्थानिक भागातील आहेत.
शहरात विक्रीसाठी येणा-या विक्रेत्यांकडे मुंबई, दिल्ली, वडाळा, लुधियाना येथून मागवलेले ऊबदार कपडे आहेत. त्यातच लहान मुलांपासुन ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी आवश्यक असलेले ऊबदार कपडे या स्टॉलवर उपलब्ध झाले आहेत. या स्वेटर बाजारात स्वेटर, स्कार्प, हातमोजे, कानटोपी, जॅकेट, महिलांचे स्वेटर विक्रीस उपलब्ध आहेत.
लहान मुलांचे स्वेटर 200 ते 350 रुपयांपर्यंत, ज्येष्ठांचे स्वेटर 300 ते 500 रुपयांपर्यंत, जॅकेट 400 ते 1100 रुपयांपर्यंत, लहान स्वेटर 200 ते 350 रुपये विविध व-हायटीमध्ये, लेडीज स्वेटर 350 ते 550 रुपये, कानटोपी 50 ते 90रुपयांपर्यंत, हातमोजे 50 ते 80 रुपयांपर्यंत, हेडफोल टोपी 100 रूपये, स्कार्प 100 रुपयेपर्यांत स्वेटर बाजारात उपलब्ध आहेत. अशी माहती किरकोळ व होलसेल व्यापारी शेख ईब्राहीमबाबा यांनी सागीतले.