परभणीत बाबासाहेबांचा अपमान, संतप्त जमावाची दगडफेकीनंतर ट्रेन रोखून लोको पायलटला मारहाण

बुधवार, 11 डिसेंबर 2024 (09:53 IST)
Parbhani News: महाराष्ट्रातील परभणी रेल्वे स्थानकाबाहेर बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचे मंगळवारी अज्ञात व्यक्तीने नुकसान केले. त्यानंतर हे प्रकरण चिघळले. संविधानाच्या प्रतिकृतीची हानी झाल्याने लोक संतप्त झाले. त्यामुळे जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संविधानाच्या प्रतिकृतीचे नुकसान झाल्याची बातमी पसरल्यानंतर सुमारे 200 लोकांचा जमाव प्रतिमेजवळ जमा झाला आणि घोषणाबाजी करू लागला. परिसरात दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिका-याने सांगितले की, दरम्यान संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक आंदोलक रेल्वे स्थानकाकडे जाऊ लागले. व काही आंदोलकांनी नंदीग्राम एक्सप्रेस ट्रेनच्या लोको पायलटला खाली खेचले आणि त्याच्यावर हल्ला केला. आंदोलकांनी 30 मिनिटांहून अधिक काळ रेल्वे रुळ रोखून धरले, तसेच नंतर त्यांना शासकीय रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांनी हटवले आणि ट्रेन अखेरीस 6:52 वाजता परभणी स्थानकातून निघाली, असे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती