मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मुंबईमध्ये ग्रँट रोड परिसरातील सिल्व्हर थिएटरला भीषण आग लागल्याची घटना घडलीआहे. सर्वांना तातडीने थिएटरमधून बाहेर काढण्यात आले आणि अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.