सोशल मीडिया X वरील एका पोस्टमध्ये विजय वडेट्टीवार यांनी दावा केला की, बसच्या चालकाला मोठी वाहने चालवण्याचा अनुभव नाही. ते म्हणाले, या अपघातातील बस चालक हा कंत्राटी चालक होता आणि चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढी मोठी बस चालवण्याचा अनुभव नसताना त्याला हे काम कसे मिळाले? या अक्षम्य कृत्याला बेस्ट प्रशासन जबाबदार आहे, त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करावी. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व जखमींच्या कुटुंबीयांना सरकारने तातडीने मदत द्यावी, अशी आमची मागणी आहे.कुर्ला पश्चिम येथील आंबेडकर नगर रोड भागात भरधाव बेस्ट बसने धडक दिल्याने घडलेला अपघात अत्यंत दुःखद आहे. अपघातात ७ जणांचा मृत्यू आणि ४९ नागरिक गंभीर जखमी झाल्याचे माहिती पुढे आली आहे. या दुर्घटनेतील मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 10, 2024