अमित देशमुख यांचे प्रत्युत्तर, ऑफलाईन परीक्षा घेणे अनिवार्य

सोमवार, 7 जून 2021 (08:07 IST)
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात किंवा शक्य नसल्यास स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. या परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना मोठ्या धोक्याला समोरे जावे लागेल यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन किंवा स्थगित करावी अशी मागणी करण्यात आली होती. यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत केंद्रीय कौन्सिल ने परवानगी दिलेली नाही.तसेच विद्यापीठाच्या परीक्षा धोरणाशी हे सुसंगत नाही अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
 
वेद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या मागणीवर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत केंद्रीय कौन्सिल ने परवानगी दिलेली नाही.तसेच विद्यापीठाच्या परीक्षा धोरणाशी हे सुसंगत नाही. उच्च न्यायालय मुंबई यांनी यापूर्वीच या संदर्भातील याचिका फेटाळली आहे. यामुळे ऑफलाईन परीक्षा घेणे अनिवार्य आहे. परीक्षा कालावधीत सर्व विद्यार्थ्यांच्या कोवीड सुरक्षेची काळजी घेण्याची ग्वाही विद्यापीठ देत आहे. आशा आशयाचे ट्विट वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती