सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामध्ये अन्नपदार्थांमध्ये कीटक किंवा इतर असामान्य वस्तू सापडल्याच्या घटना दाखवल्या जातात. तशीच एक घटना वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये घडली आहे. शिर्डीहून मुंबईला जाणाऱ्या एका कुटुंबाला वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मिळालेल्या त्यांच्या जेवणात झुरळ दिसले.
ही घटना कुटुंबीयांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
IRCTC ने गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला-
या घटनेची दखल घेत IRCTC ने प्रदात्यावर दंड आकारण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, IRCTC ने या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे.