बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (08:01 IST)
नाशिक तालुक्यातील वाडगावजवळील ग्रुप ग्रामपंचायतीच्या दाबडगावातील शिवारातील दाबडदरा येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.३०) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
 
शिवन्या वाळू निंबेकर (वय ४) असे मुलीचे नाव असून, ती घराबाहेर खेळत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. घटनेवेळी या भागात पूर्ण अंधार होता. हल्ला झाला त्याच क्षणी निंबेकर वस्तीकडे येणाऱ्या एका मोटरसायकलचा हेडलाईट या बिबट्यावर पडला आणि त्यामुळे घाबरलेला बिबट्या शिवन्याला खाली टाकून अंधारात पळून गेला. घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी धाव घेत तिला सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.  बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती