शेतात महिलेवर सामूहिक बलात्कार

गुरूवार, 28 एप्रिल 2022 (15:38 IST)
बीड- शेतात काम करणाऱ्या एका विहवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घरालगात असलेल्या शेतात ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 
 
22 वर्षीय पीडित महिला ही घरालगत शेतात काम करत होती. दरम्यान अंगद केशव भदाडे (वय 40 वर्षे) साजन तिडके (वय 30 वर्षे) या आरोपींनी पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडितेला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी 22 वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात 376 (ड), 323, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
 
सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. त्यानंतर अवघ्या 3 तासांत पोलिसांनी आरोपींना अटक केली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती