जवखेडे तिहेरी हत्याकांडाचा ह्या दिवशी निकाल !

गुरूवार, 28 एप्रिल 2022 (14:55 IST)
जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडाचा निकाल 10 मे 2022 रोजी दिला जाणार आहे. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
 
या खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस सरकारी पक्ष आणि आरोपी वकिलांच्यावतीने पोलिसांनी जप्त केलेल्या काही वस्तू संदर्भात आक्षेप घेण्यात आले होते.या दोन्ही आक्षेपांवर आज न्यायालयाने दोन्ही पक्षात समक्ष पडताळणी करून घेतली. या खटल्यातील आरोपींनी न्यायालयात अर्ज केला आहे की, आरोपीच्या वकिलांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत मानधन देण्यात यावे.
 
या अर्जावर विशेष सरकारी वकील उमेशचन्द्र यादव- पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. आरोपींचे वकील हे विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनलवरील वकील नाहीत.खटल्याची सुनावणी संपलेली आहे आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये अशा स्वरूपाची मागणी करण्यात आलेली आहे.
 
वकिलांना मानधन देण्याच्या अर्जावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवलेला आहे आहे. आता 10 मे रोजी खटल्याचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती