पार्टी देण्यास नकार दिल्यावर धारधार शस्त्राने वार केले

शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (14:28 IST)
पुण्याच्या पिंपरी परिसरातील देहूगाव येथे एका तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या जखमी तरुणाने पोलिसात तक्रार दिली आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निखिल नंदनराज चव्हाण असे या हल्ल्याने जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर धारधार शस्त्राने वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे. नाव आकाश चंद्रकांत पाटोळे असे आहे. या आरोपीने  निखिल आपल्या नातेवाईकांकडे आला असता त्याच्या कडून पार्टी मागितली . तरुणाने पार्टी  देण्याचा नकार दिल्यावर धारधार शस्त्राने तरुणावर वार केले. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला  गंभीर इजा झाली असून तो जखमी झाला असून त्याने आरोपीच्या विरोधात देहूगाव पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपीवर खुनाच्या प्रयत्नासह गुन्हा दाखल केला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे.पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नसून प्रकरणाचा तपास लावत आहे. 
  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती