निर्दयीने एक ते दीड महिन्याच्या बाळ कपड्यात गुंडाळून रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीच्या आडोशाला ठेवले. नंतर सकाळी सहा वाजताच्या सुमारास येथील कामगाराच्या ही बाब लक्षात आल्यावर त्याने लगेच शेजारीच असलेल्या पेट्रोलपंपाचे मालकाला सांगितली. मालकाने घटनास्थळी धाव घेत इंदापूर पोलिसांना याबाबद माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून बाळ ताब्यात घेतलं आहे.
बाळ चहाच्या टपरीच्या आडोशाला ठेवले होते. माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी महिला बाळाला तिथेच सोडून निघून गेली. थंडीचा कडाक्यात उघड्यावर असलेला चिमुकला जीव गारठले होते. एका कामगाराच्या लक्षात आल्यावर पुढील कार्रवाई करण्यात आली तोपर्यंत कामगाराच्या पत्नीने मुलाला आपल्या जवळ घेऊन बाळाला शेकोटीची ऊब दिली.