Pune Porsche Accident : आजोबांनी अल्पवयीन नातवाला वाढदिवसानिमित्त भेट दिली आलिशान कार, पोलिसांचा खुलासा

Webdunia
रविवार, 26 मे 2024 (15:04 IST)
पुण्यातील पोर्श कार अपघातात  दररोजचे नवीन खुलासे होत आहे.अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया या दोन अभियंत्यांचा कारच्या धडकेने मृत्यू झाला. ती कार आरोपीच्या आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी आरोपीला भेट दिल्याचा खुलासा मुलाच्या आजोबांच्या एका मित्राने केला. ते म्हणाले मुलाच्या आजोबांनी दोन महिन्यांपूर्वी एका व्हाट्सअप ग्रुपवर कारचा फोटो टाकत ही आलिशान कार माझ्या नातवाच्या वाढदिवसाची भेट असे लिहिले होते. 

कार अपघात प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल यांना ड्राइव्हर गंगारामला धमकवल्या बद्दल आणि अपघाताच्या वेळी तो कार चालवत असल्याचा खोटा दावा करण्यासाठी दबाब टाकल्याबाबद्दल अटक केली होती. गंगाराम यांना सुरेंद यांनी त्यांच्याघरी डांबून ठेवले होते. या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, अल्पवयीन आरोपीने बाईकला धडक दिल्यावेळी तो पूर्णपणे शुद्धीत होता. या अपघातात अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अल्पवयीन मुला ऐवजी गंगारामला अडकवण्यासाठी कथेत फेरफार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्या... 
असा खुलासा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला.तसे ड्राइव्हर गंगारामचा फोन गायब असून सुरेंद्र अग्रवाल यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये छेडछाड करण्याचे देखील त्यांनी सांगितले.
 
Edited by - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

पुढील लेख