ऑपरेशन वर्षा 21: महाराष्ट्रात पूरग्रस्त भागात मदत कार्यासाठी वैद्यकीय पथकासह लष्कराची तुकडी तैनात

शुक्रवार, 23 जुलै 2021 (22:01 IST)
अतिवृष्टी आणि त्यामुळे विविध नद्यांची वाढलेली पातळी यामुळे अनेक राज्यांतील बर्याच भागांमध्ये पुराचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा पुराचा तडाखा बसला आहे. नागरी प्रशासनाच्या विनंतीनुसार  भारतीय लष्कराने पूरग्रस्त भागांमध्ये स्थानिक प्रशासनास मदत करण्यासाठी मदत आणि बचाव पथके तैनात केली आहेत.
औंध लष्करी तळ आणि पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर समूहाची एकूण 15 मदत आणि बचाव पथके  रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्त भागात रात्री  तैनात करण्यात आली होती. ही पथके परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत पाण्याखाली गेलेल्या भागात अडकलेल्याची सुटका करण्यात नागरी प्रशासनाला मदत करणार आहेत. दक्षिणी कमांडचे जीओसी-इन-सी लेफ्टनंट जनरल जेएस नैन यांनी सांगितले की भारतीय लष्कर या संकटाच्या काळात लोकांच्या पाठीशी आहे आणि सैन्याकडून सर्व मदत पुरवली जाईल. पूरग्रस्त भागातून हलविण्यात येणाऱ्या स्थानिकांना आवश्यक ते प्राथमिक उपचार आणि औषधे पुरविण्यासाठी  मदत पथकांमध्ये अभियंते  आणि लष्करातील वैद्यकीय पथकाचा समावेश आहे
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती