मिळालेल्या माहितीनुसार,या गँरेज मध्ये बस आणि इतर गाड्यांची दुरुस्ती केली जाते. मध्यरात्री या गँरेजला अचानक लागलेल्या आगीमुळे येथे दुरुस्ती साठी आलेल्या 14 बसेस जळून खाक झाल्या.पुणे आणि पीएमआरडीए च्या अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने अग्नीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ होण्यापासून टळला.आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार,आग इतकी भीषण होती की,आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते. केमिकल चा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या आगीत 14 बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या. सुदैवाने कोणती ही जीवित हानी झालेली नाही.वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे समजले आहे.