सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सी-मेट हे मागील 25 वर्षांपासून एकत्र काम करत आहे. या करारामुळे याला अधिक मूर्त रूप येण्यास मदत झाली आहे. या कराराच्या माध्यमातून समान कार्यक्षेत्रात एकत्रित संशोधन करणे शक्य होणार आहे.तसेच अध्यापन,अध्ययन,संशोधनासाठी लागणारे साहित्य आदींची देवाण घेवाण होणार आहे.स्कूल ऑफ फिजिक्स,स्कूल ऑफ केमिस्ट्री,स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आणि अन्य संबंधित विभागांतील विद्यार्थ्यांना यामुळे अधिक सखोल अभ्यास करण्यास मदत होणार आहे.