असा घातला दुचाकीस्वाराला 2 लाख 33 हजारांचा गंडा

शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (21:58 IST)
पुण्यातल्या इंदापूर शहरात तीन अनोळखी इसमांनी एका दुचाकीस्वाराला 2 लाख 33 हजारांचा गंडा घातला.चोरी करण्यासाठी चोर अनेक क्लुप्त्या शोधून काढतात. बँकेबाहेर, दुकानाबाहेर सावज हेरुन पैसे लंपास करणारे ठग तुम्ही पाहिले असतील.इंदापूरात विकास भोसले यांना अगदी दिवसाढवळ्या भर रस्त्यात हातोहात गंडवलं आहे. 
 
दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी रस्त्यावर 10 रूपयांच्या तीन नोटा टाकल्या.भोसले यांना पैसे रस्त्यावर पडल्याचं सांगितलं.हाच मोह भोसलेंना महाग पडला. भोसलेंनी पैसे उचलण्यासाठी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. ते पैसे उचलायला लागताच चोरट्यांनी हँन्डलला अडकवलेली पैशांची पिशवी घेऊन धूम ठोकली. भोसले यांना 30 रुपयांचा मोह चांगलाच महागात पडला. त्यांच्याजवळची 2 लाख रुपयांची बॅग चोरांनी लंपास केली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती