पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतल्यानंतर दीपिकाने क्विंटीकडून दुसरा सेट 27-29 असा गमावला. एके काळी दोघांमध्ये 2-2 असा सामना सुरू होता. मात्र, दीपिकाने तिसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत 4-2 अशी आघाडी घेतली. दीपिकाने 25, तर क्विंटीला केवळ 17 अर करता आला. नेदरलँडच्या या खेळाडूने पहिला शॉट बाहेर खेळला त्यामुळे तिला गुण मिळाला नाही. यानंतर दीपिकाने पुढच्या सेटमध्ये प्रतिस्पर्ध्याला एकही संधी दिली नाही आणि सहज विजयाची नोंद केली.