Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

मंगळवार, 31 डिसेंबर 2024 (06:30 IST)
वातावरण बदलत आहे, थंडीचे दिवस जावून आता उष्णता वाढायला लागेल. दिवसा पडणार्या कडक उन्हामुळे अनेकांनी स्किन केयर लावणे देखील सुरु केले आहे. या वातावरणात त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. काळजी घेतली नाही तर भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. त्वचेची काळजी घ्यायची असेल तर घरीच नारळाचे क्रीम कसे बनवावे शिकून घ्या . 
 
साहित्य 
1 कप नारळाचे तेल 
1 चमचा नैसर्गिक एलोवेरा जेल
1 ते 2 थेंब एसेंशियल ऑइल 
 
कृती  
नारळाचे क्रीम बनवण्यासाठी एका वाटीमध्ये वितळलेले नारळाचे तेल आणि ताजे एलोवेरा जेल घ्या. आता याला चांगल्याप्रकारे मिक्स करा. म्हणजे हे चांगले एकत्र होतील. मग यामध्ये काही थेंब एसेंशियल ऑइल टाका. तुम्हाला हवे असल्यास या करिता लैवेंडर, पेपरमिंट किंवा साइट्रस तेल निवडु शकतात. तसेच चांगल्या प्रकारे मिक्स करा. तुमचे नारळाचे क्रीम तयार आहे. कोरडी त्वचा असणाऱ्या लोकांसाठी हे क्रीम फायदेशीर असते. या क्रीमचा उपयोग केल्यास तुमची त्वचा मऊ राहिल. क्रीम बनवतांना साहित्याचे प्रमाण व्यवस्थित पहावे. कारण दहा दिवसांच्या वरती याचा उपयोग वर्ज्य असेल. तसेच पाहिले थोडीशी त्वचेला लावून पहा यासाठी की क्रीम तुम्हाला सूट होत आहे का.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती