सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या चार पाच दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता आज पुन्हा पाऊस हजेरी लावणार असून मुंबई, कोकण घाट माथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर राज्यातील उर्वरित भागात ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरी बरसणार. तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील अकोला, बुलडाणा, अमरावती, वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तरं महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, नाशिक जळगावात रिमझिम पाऊसाची शक्यता वर्तवली असून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण भागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील मध्यमहाराष्ट्रात पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
सध्या झारखंड आणि परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.
आज पासून पुढील चार दिवस राज्यात रिमझिम पावसाच्या सरी बारसण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस येणार अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. धरण्यात पाणी वाढल्यामुळे नदीकाठीच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.