तसेच आगीच्या घटनेनंतर निलगिरी अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी माधव आणि गणेशवार या दोघांना अटक करून याप्रकरणी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी तरुणाच्या आईने सांगितले की, 'माझा मोठा मुलगा याने काल रात्री मला पकोडे बनवायला सांगितले. मी पकोडे बनवायला तयार असताना चुकून जास्त पाणी टाकले आणि पकोडे बनवायला उशीर झाला. मग तो मला आणि त्याच्या लहान भावाला शिव्या घालू लागला. नंतर तो आमच्यावर हल्ला करू लागला, त्यामुळे मी माझ्या लहान मुलाला घेऊन तेथून पळ काढला. काही वेळाने आम्ही परत आलो आणि त्याने आमच्या घराला आग लावल्याचे दिसले. निलगिरी पोलिसांनी सांगितले की, 'आम्हाला अग्निशमन विभागाकडून माहिती मिळाली की, दोन भावांमध्ये झालेल्या भांडणामुळे एकाने आपल्या घराला आग लावली आहे. त्यानंतर आमची टीम घटनास्थळी पोहोचली आणि दोन्ही भाऊ मद्यधुंद अवस्थेत आढळले. आता त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले असले तरी अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.