Oppo चे हे 2 शानदार स्मार्टफोन झाले स्वस्त, कमी किमतीत मिळवा 48 एमपी कॅमेरा

मंगळवार, 14 मे 2019 (15:37 IST)
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo च्या 2 पॉपअप कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनच्या किंमतींत कपात झाली आहे. Oppo च्या Oppo F11 Pro आणि Oppo F11 या फोनच्या किंमती कमी झाल्या आहेत. कंपनीने Oppo F11 Pro च्या 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज, दोन्ही व्हेरिएंटचे मूल्य कमी केले आहे. 
 
एका ट्विटनुसार आता Oppo F11 Pro ची सुरुवाती किंमत 22,990 रुपये आणि 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 23,990 रुपये असेल. Oppo ने हे दोन्ही फोन या वर्षी मार्च मध्ये लॉन्च केले होते. लाँचिंग दरम्यान ओप्पो एफ11 प्रो ची सुरुवाती किंमत 24,990 रुपये होती, तर त्याचवेळी ओप्पो एफ11 ची किंमत आता 17,990 रुपये आहे.
 
* Oppo F11 Pro तपशील 
यात ड्युअल सिम सपोर्टसह Android 9.0 आधारित कलर ओएस 6 स्किन मिळेल. या व्यतिरिक्त या फोनमध्ये 6.5 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल, ज्याचे रिझोल्यूशन 1920 × 1080 आहे. डिस्प्लेमध्ये नॉच मिळणार नाही. या व्यतिरिक्त हा फोन 4/6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात MediaTek Helio P70 प्रोसेसर मिळेल.
 
* Oppo F11 Pro कॅमेरा 
यात ड्युअल रिअर कॅमेरा मिळेल ज्यात एक कॅमेरा 48 मेगापिक्सलचा तर दुसरा 5 मेगापिक्सेलचा असेल. याशिवाय, एक 16 मेगापिक्सेलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा असेल. कॅमेर्‍यासह आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा सपोर्ट मिळेल. कंपनीने पॉप अप कॅमेर्‍याला राइजिंग कॅमेरा असे नाव दिले आहे. यात VOOC फ्लॅश चार्ज 3.0 ला सपोर्ट करणारी 4000 एमएचएच बॅटरी देखील मिळेल. कंपनी दावा करते की 20 मिनिटांत फोन पूर्णपणे चार्ज होईल. 
 
* Oppo F11 Pro किंमत 
या फोनची 4 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 22,990 रुपये आहे आणि 6 जीबी रॅमसह 28 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 23,990 रुपये आहे. हा फोन 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजसोबत उपलब्ध होईल. दोन्ही फोनचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे आणि हे फ्लिपकार्ट, पेटीएम आणि ऑफलाईन स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकतात. पेटीएम फोनसह 3,400 रुपयांचा कॅशबॅक देत आहे आणि जिओकडून 4,900 रुपयांचा लाभ मिळेल आणि 3.2 जीबी डेटा देखील मिळेल. तसेच आपण एचडीएफसी कार्डद्वारे पैसे दिले तर आपल्याला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती