Nagpur News: महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील दक्षिण उमरेड वनक्षेत्रातून एका वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन वाघांमधील रक्तरंजित लढाईत एका वाघाचा मृत्यू झाला आहे. अशी माहीत समोर आली आहे. ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वी घडली असावी, अशी भीती वन विभागाने व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितनुसार, वाघाच्या शरीराची तपासणी केली असता, त्याचे सर्व अवयव सुरक्षित असल्याचे आढळून आले, परंतु शरीराचा मधला भाग मांसाहारी प्राण्यांनी खाल्लेला दिसून आला. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, लढाईनंतर वाघाचा मृत्यू झाला आणि त्याचे शरीर काही वन्य प्राण्यांनी खाल्ले असावे.