ठाण्यात लाच घेताना तलाठीच्या विरुद्ध एसीबी कडून गुन्हा दाखल

मंगळवार, 29 एप्रिल 2025 (12:33 IST)
सध्या ठाणे जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. सरकारी अधिकाऱ्याकडून लाच मागितल्या च्या प्रकरणांनंतर आता जमिनीच्या नोंदी हस्तांतरित करण्यासाठी एका व्यक्तीकडून 50 हजार रुपयांची लाच मागल्याप्रकरणात तलाठीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 ALSO READ: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नोंदणी एनईएमएल पोर्टलवर होणार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले
या तलाठीने गृहनिर्माण संस्थेच्या नावावर जमिनीच्या नोंदी हस्तांतरित करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे. अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षकांनी सांगितले. 
ALSO READ: नागपूर पोलिसांचे पाकिस्तानी नागरिकांवर बारकाईने लक्ष,अनेकांना नागरिकत्व मिळाले
तक्रारदाराने तहसील कार्यालयात सोसायटीच्या नावावर भूखंड हस्तांतरित करण्यासाठी अर्ज सादर केला होता. आवश्यक कागदपत्रे सादर करूनही, काम प्रलंबित ठेवण्यात आले आणि आरोपी अधिकाऱ्याने अर्ज मंजूर करण्यासाठी लाच मागितली.
ALSO READ: महाराष्ट्र दिनी पंतप्रधान मोदी पूर्ण दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर,अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार
सोमवारी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षकांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की लाच मागितली गेली होती, परंतु आरोपीने एकही पैसे घेतले नाहीत. या प्रकरणासंदर्भात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती